नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा वेग काहीसा कमी झालेला असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. देशात गेल्या २४ तासात ४६ हजार ६१७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ५९ हजार ३८४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,०४,५८,२५१ झाली असून, आजपर्यंत २,९५,४८,३०२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५,०९,६३७ आहे. तर, आजपर्यंत देशात ४,००,३१२ रूग्ण कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३४,००,७६,२३२ जणांचे लसीकरण झाले आहे.
India reports 46,617 new #COVID19 cases, 59,384 recoveries, and 853 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 3,04,58,251
Total recoveries: 2,95,48,302
Active cases: 5,09,637
Death toll: 4,00,312Total Vaccination: 34,00,76,232 pic.twitter.com/M8bYPkUM9N
— ANI (@ANI) July 2, 2021
महाराष्ट्रात स्थिती काय?
राज्यात ९१९५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन ८६३४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५८,२८,५३५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,१६,६६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.०१% झाले आहे.
राज्यात आज 9,195 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,634 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,28,535 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,667 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.01% झाले आहे. pic.twitter.com/HSgCwJf7iI
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.