HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णाला आता नातेवाइकांना भेटण्याची परवानगी – राजेश टोपे

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत . कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे. १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२ जुलै) दिली.

तसेच, कोरोना रुग्णालय असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश नाकारला जातो. मात्र, यापुढे त्यांना प्रवेश नाकारता येणार नाही, असे देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. रुग्णालयात एक जागा ठेवावी जिथे रुग्ण आणि नातेवाईकांना बोलता येईल. तसेच, आयसीयूमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकांबाबत मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी देखील ५ ते ८ हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे या तक्रारी टाळण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायच्या त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेतील. त्यापेक्षा जास्त दर घेतला तर परवाना रद्द करण्याबरोबर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, ठरवलेल्या दरापेक्षा जास्त दर लावला तर त्या जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर तक्रार करण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्याने चित्रीकरणाला वेग येणार | सांस्कृतिक कार्यमंत्री

News Desk

राष्ट्रवादीनंतर शिवसेनासुद्धा आमदार-खासदारांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार !काॅंग्रेस-भाजप अनुकरण करणार ?

Arati More

कोरोना विरोधातल्या युद्धाला पुन्हा सुरुवात – मुख्यमंत्री

News Desk