HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूर शहरात मृत्यू झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर । कोरोना मुक्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये आज (१२ एप्रिल) कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील पाछा पेठ परिसरातील किराणा दुकान चालकाची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आलई आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती. १० एप्रिल रोजी पहाटे त्याला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.११ एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे.

 

त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली पाच-सहा पेठ परिसरातील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल ऑम्वेट यांचं आज निधन!

News Desk

“कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले!

News Desk

बैलगाडी नदीत पडून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

News Desk