HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२५

मुंबई | “राज्यात आज (२६ मार्च) कोरोनाच्या ३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत”, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा २ रुग्णालयांकडून संदर्भित होऊन वाशी येथील जनरल हॉस्पिटल येथे अत्यंत गंभीर अवस्थेत २४ मार्च रोजी दुपारी भरती झाली. त्याच दिवशी रात्री तिचा मृत्यू झाला. ती कोरोनाबाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन बुधवारी (२५ मार्च) स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.

आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासात आला असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता. पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

मुंबई – ४९

पिंपरी-चिंचवड – १२

पुणे – १८

सांगली – ९

नवी मुंबई – ६

कल्याण – ६

नागपूर – ५

यवतमाळ – ४

अहमदनगर – ३

ठाणे – ३

सातारा – २

पनवेल – २

उल्हासनगर – १

औरंगाबाद – १

रत्नागिरी – १

वसई विरार – १

पुणे ग्रामीण – १

सिंधुदुर्ग – १

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १२५

मृत्यू ४

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही!, राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

News Desk

पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाची अन्य पक्षांवर मात

News Desk

अजितदादा जसा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता तसा तो ६ हजार कोटींचा चेक घेऊन फिरत आहात त्याचं काय करणार?

News Desk