HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांना दिलासा; खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

मुंबई | कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणांसाठी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी जामीन मिळावा अशी विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला असून खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मलिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असल्यामुळे नवाब मलिक यांची प्रकृती प्रचंड खालावली असल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, असा अर्ज मलिकांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने निकाल दिला असून मलिकांना आता खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय मलिक यांच्यासाठी दिलासा मानला जात आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील क्रिटी केअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहायची मुभा सुद्धा न्यायालयाने दिली आहे. याशिवाय उपचांरासोबतच पोलीस बंदोबस्तासाठी लागणारा खर्च सुद्धा मलिक यांनाच करावा लागणार आहे.

नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ईडीने मलिक यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.  अटक झाल्यानंतर सुरुवातीला मलिक हे पोलीस कोठडीत होते. मात्र, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळेच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. किडनीच्या आजारामुळे पायांना सूज येत असल्याचे या अर्जात सांगण्यात आले होते. यासह खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी असेही अर्जात म्हंटले आहे. अखेर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गारपिठीमुळे पिकांप्रमाणे शेतकऱ्यांची घरही कोसळली

News Desk

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात श्र्वेतपत्रिका काढावी, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत आग्रही मागणी

News Desk

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

News Desk