HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेकडून थेट ‘मातोश्री’ समोरच फोडली दहीहंडी!

मुंबई। कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवास मनाई करण्यात आली होती. पण, मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला आहे. मनसेसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेरच हंडी फोडली आहे.

मातोश्री बंगल्याच्या समोर मनसे नेते अखिल चित्रे यांची दहीहंडी

मनसे सैनिकांनी रात्रीपासून ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला. ठाण्यात जन्माष्टमीचे औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. त्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दहीहंडी फोडली. मनसेच्या कार्यकर्त्याने अखिल चित्रे यांना खांद्यावर बसवलं आणि हंडी फोडली. त्यानंतर घोषणाबाजी करून कार्यकर्ते निघून गेले.

मनसेचा झेंडा हातात घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी

तर दुसरीकडे, ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहिहंडी लावून मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्यातील नौपाडा येथील मनसेचे मुख्य कार्यालय येथे देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेने आपला सराकार विरोधात निषेध नोंदवला. तर पोलिसांनी रात्रीच अनेक मनसैनिकांची धरपकड सुरु केल्याने कार्यकर्त्यांची रात्रभर पळापळ सुरु होती.

तर दुसरीकडे, ‘सर्व सण-उत्सव साजरे झालेच पाहिजे, तुम्हाला नियम लावायचे आहेत ना? मग सर्वांना नियम एक लावा. प्रत्येकासाठी नियम वेगळा असं करुन चालणार नाही. सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे. हे घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतात तर त्यात आमचा काय दोष? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

News Desk

‘भाजप’ केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने चिडीचा खेळ खेळतय! – नाना पटोले

Aprna

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

Aprna