HW News Marathi
महाराष्ट्र

कोण म्हटलं दसरा मेळावा ऑनलाईन होणार? पक्षप्रमुखांचे भाषण व्यासपीठावरुनच होणार – संजय राऊत

मुंबई | कोरोनाच्या पाश्वभुमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार सुरु आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना तुर्तास तरी पुर्णविराम लावला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साजरा होणार असल्याचे संकेत दिले आहेत

राज्यावर कोरोना संकट कायम आहे. कोरोना संकटामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावारद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… आणि बैठकीत तात्काळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे धनंजय मुंडेंनी दिले निर्देश

News Desk

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी ‘जेलभरो’ आंदोलन!

News Desk

कार्यकर्त्याच्या बाईकवरुन तीन किमी प्रवास करत जयंत पाटलांनी केली तलावाची पाहणी!

News Desk