HW News Marathi
महाराष्ट्र

“मी छोटा पैलवान आहे, तुम्ही मला इतका सोपा समजू नका”- दत्तात्रय भरणे

इंदापूर | दत्तात्रय भरणे म्हणतात “मी छोटा पैलवान आहे. तुम्ही मात्र मला इतका सोपा समजू नका. प्रत्येक डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. ते मला सगळं चांगलंच जमतं. भलेभले डाव कसं उलथवून लावायचे हे मला माहितीये,” असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. बॉल टप्प्यात आला की मी, सिक्स लावणार, अस म्हणत त्यांनी विरोधकांना देखील इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील नेहमीच एकमेकांवर आक्रमक टीका करताना दिसतात. अशातच दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात राजकीय फटकेबाजी करत विरोधकांना निशाण्यावर घेतलं आहे.

जनतेच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध

यावेळी बोलताना “मी पुण्यात शिकत असताना शिवाजी मराठा हायस्कूलला होतो. तिथे चिंचेची तालीम होती. तिथला मी पण पैलवान आहे. मी छोटा पैलवान आहे. शाळा, अभ्यास करत मी काहीवेळ पैलवानकी केलेली आहे. यासाठी मला घरून खुराख येत होता,” अशी आठवण भरणे यांनी सांगितली. “इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, माझ्या रक्तातच काम आहे, मी खोटं-नाटं लबाडीचा धंदा करीत नाही. ज्या इंदापूरकरांमुळे मला मंत्रिपदाची खुर्ची मिळाली, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बॉल टप्प्यात आला की मी, सिक्स लावणार”. असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिलाय.

क्रिकेटच्या मैदानातून मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी सुरुच आहे. “बॉल टप्प्यात आला की मी सिक्सर लावणारच”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय. दिवाळीच्या तोंडावर दत्तात्रय भरणेंनी राजकीय फटाके फोडायला सुरुवात केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी ७ दिवस करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

News Desk

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान सुरु 

News Desk

फडणवीसजी, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली? काँग्रेसचा सवाल

News Desk