HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांना पुन्हा धक्का! 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ करण्यात आली आहे. मलिकांना १८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून मलिकांना घरचे जेवण आणि औषधे देण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मलिकांना रमजान काळात कोठडीत राहावे लागणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने मलिकांना २३ फेब्रुवारीला अटक केले होती. 

मलिकांनी दाऊदची ३०० कोटींची मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी त्यांचा संबंध असल्याचे तपासात आढळून आले. या पार्श्वभूमीवर मलिकांवर ईडीने कारवाई करत २३ फेब्रुवारी सकाळी त्यांच्या घरातून त्यांना अटक केली. मलिकांनी पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेत मला केलेली अटक ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा, यात केला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांची ही याचिका फेटाळून लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

swarit

कुठल्याही परिस्थितीत ५२०० पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची ग्वाही

News Desk