HW News Marathi
महाराष्ट्र

“चुकीला माफी नाही”, पडळकरांच्या हल्ल्यावर अजित पवारांचं भाष्य!

नाशिक। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यावर काही तासातच त्याचे पडसाद दिसले. काल (३० जून) सायंकाळी पडळकर ह्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून, हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून झाल्याचा आरोप पडळकर यांनी केला. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. आज (१ जुलै) नाशिकमध्ये ते बोलत होते.

चुकीला माफी नाही

पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेक हल्ल्याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

“अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा”, पडळकरांची मागणी

दगडफेकीच्या घटनेनंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केलीय. याबाबत अजित पवार म्हणाले कि “कायदा हातात घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे”.

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश केलाय. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकून पळ काढणाऱ्याचा फोटो समोर आलाय. दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडळकरांच्या गाडीवर झालेल्या हल्या प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली त्या तरुणांचे अमित सुरवसे आहे. अमित हा 25 वर्षीय असून त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत अमित हा लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. अमित हा स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने या आधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात अमित याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल. राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांसोबत अमित याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र त्याच्याकडे राष्ट्रवादीचे कोणतेही पद नसल्याचे देखील कळते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil HW Exclusive : भाजपच्या नेते मंडळींना ‘कोरोना’पेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते !

News Desk

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

Aprna

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च 2017 रोजी  सादर होणार

News Desk