HW News Marathi
महाराष्ट्र

कर्ज मंजूरीसाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

मलकापूर | शेतक-याच्या पत्नीकडे पीक कर्जाच्या मंजूरीसाठी अधिका-याने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब मलकापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पिककर्जा सोबत वेगळा पॅकेज देईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला.संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर

News Desk

राऊत यांनी कोविड पेशंटचे काय होणार? असा प्रश्न विचारला असता तर आनंद झाला असता – फडणवीस

News Desk

राणा दाम्पत्याला अटक; आजची रात्र जेलमध्येच

Aprna
मुंबई

कल्याणमध्ये कुत्र्यांवर पोलिसांचा ताबा

News Desk

मुंबई | कल्याण पश्चिम येथील गोदरेज हिल या उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. परदेशी जातीच्या तब्बल 9 कुत्र्यांना अत्यंत दयनीय अवस्थेत डांबून ठेवणाऱ्या डॉक्टरवर खडकपाडा पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कल्याणमधील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल परिसरात डॉक्टर विरेंद्रपाल सिंग यांचा प्रशस्त बंगला आहे. या बंगल्यात अनेक कुत्र्यांना अत्यंत क्रूरतेने डांबून ठेवल्याची माहिती वाशीतील एनजीओचे कार्यकर्ते चेतन रामानंद शर्मा यांना मिळाली होती.

चेतन शर्मा यांनी याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बंगल्यात जाऊन पाहणी केली. त्यावेळी समोरचे दृश्य पाहून सर्वानाच धक्का बसला. अत्यंत देखणे आणि सर्वात महागडे समजले जाणारे परदेशी जातीचे (फॉरेन ब्रीड) 9 कुत्रे अत्यंत मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. गेल्या कित्येक दिवसांपासून या कुत्र्यांना अत्यंत अपुऱ्या जागेत आणि अन्नविना ठेवण्यात आल्याचे त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तर काही कुत्रे भुकेपोटी आपलीच विष्ठा खात असल्याचे आढळून आल्याची माहिती चेतन शर्मा यांनी दिली

या सर्व कुत्र्यांची बंगल्यातून सुटका करून त्यांना काही वेळ खडकपाडा पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर तातडीने औषधोपचार आवश्यक असल्याने या सर्वांना चेतन शर्मा यांच्या तुर्भे येथील केंद्रात हलवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या या कुत्र्यांमध्ये 3 सायबेरीयन हस्की,1 डोंगो अर्जेंटिनो, 1 सेंट बर्नार्ड, 3 गोल्डन रेटव्हीवर,1 फ्रेंच मॅस्टीफ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. या एका कुत्र्याच्या पिल्लाची किंमतच सुमारे 70 हजारांच्या घरात असल्याची माहिती प्राणीमित्राने दिली. विरेंद्रपाल सिंग हा या कुत्र्यांचे ब्रीडिंग करून त्यातून लाखो रुपये कमवत असल्याची शक्यता प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे

Related posts

राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये स्वच्छता मोहीम

News Desk

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ‘या’ विकासकामांचे होणार लोकार्पण

Aprna

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna