HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार झाले क्वॉरंटाईन!

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सचे पालन करणे, आणि इतर खबरदारी घेताना पाहिले आहे. पण, आता अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांची कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. पण ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम थांबावल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत अजित पवार यांनी आपली कामे, दौरे सुरुच ठेवले होते. अजित पवार कायम आपल्यासोबत सेनिटायझर बाळगत होते. इतरांनीही ते खबरदारी घेण्याचा सल्ला देत होते हे आपण सगळ्यांनी पाहिले आहेच.

गेल्या २ दिवसांपासून अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाउन होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचीही चाचणीही करण्यात आली पण रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.

कोरोनासदृश्य लक्षणे आढळत असल्याने अजित पवार पुढील काही दिवस क्वारंटाइन राहणार आहे. ताप आणि थंडी जाणवू लागल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम हे रद्द केले आहे. आजचा (२२ ऑक्टोबर) राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ!

News Desk

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’, पंढरपूर निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

News Desk