मुंबई | ‘देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला याला भेटायला येत होत्या हे खरं आहे का? हे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट करावं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला यांच्यातील भेटीबाबत केलेल्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे.
संजय राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष त्यावेळी अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होता का?’, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ‘संजय राऊतांचं हे विधान अत्यंत धक्कादायक आहे आणि तरीही कॉंग्रेस पक्षातून कोणीही या विधानावर आक्षेप घेत नाही आहे हे पाहून कॉंग्रेस़ पक्ष किती स्वार्थी आहे हे दिसून येत आहे, असा आरोप फडणवीसांनी कॉंग्रेस पक्षावर केला.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित करावा किंवा त्याचे स्पष्टीकरण द्यावे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी समर्थन देणार का? असा घणाघाती सवालही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांनी इतक्यावरच न थांबता ‘अंडरवर्ल्ड गुंड छोटा शकील आणि दाऊद हे त्यावेळी मुंबई चालवायचे हे राऊतांचं विधान खरं आहे का? पोलीस कमिश्नरांची निवड अंडरवर्ल्ड डॉनच्या सांगण्यानुसार होत असे अशा भयावह विधानांवर काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही मत फडणवीस यांचं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.