HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे आता गृहमंत्री कुठे आहेत?”

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे. “छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री आता कुठे आहेत? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचप्रमाणे, या प्रकरणी पोलिसांचा तपास नेमक्या कोणत्या दिशेने सुरु आहे ? हे देखील गृहमंत्र्यांनी जनतेला सांगितले पाहिजे, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन अनिल देशमुख यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणतात, “छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत. तपास नेमक्या दिशेने सुरु आहे ? राज्यातील जनतेला गृहमंत्री या प्रकरणी नेमकी माहिती का सांगत नाहीत? व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा आहे हे पोलिस का सांगत नाहीत ? किंवा पडताळून का पाहिले जात नाही”, असा प्रश्नांचा माराच फडणवीसांनी केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी बोलताना पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतआहे. प्रत्येक दिवशी नवनवे फोटो आणि ऑडिओ क्लिपबाहेर येत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही पोलीस हातावर हात ठेऊन गप्प आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे ? हे राज्याच्या जनतेला समजलेच पाहिजे”

Related posts

#COVID19 : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८९१ वर, धारावीमधील रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी वारीच्या यात्रेवर निर्बंध

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, काळजीचे कारण नाही !

News Desk