HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा – अंजली दमानिया

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांचा कथित सहभाग असलेल्या भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात विशेष न्यायालयाने साक्षीदार म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच भोसरी भूखंड भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी झोटिंग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांनी काल (१ मार्च) विशेष न्यायालयात ही मागणी केली. भोसरी भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एकसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष न्यायाधीश डी. एस .झोटिंग यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही दमानिया यांनी मांडली. आता ८ मार्चला याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related posts

पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू 

News Desk

करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालया बाहेर आंदोलन

News Desk

५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक 

News Desk