HW News Marathi
महाराष्ट्र

मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आम्ही मातोश्रीवर जाणं बंद केलं नाही!

नांदेड | राज्यात विरोधी पक्ष आणि सत्तादारी पक्ष यांच्यात कायमच टीका टीपण्णी, आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. अशात शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक होत असतेच. आज (२ जून) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शरद पवार भेटीवर आणि एकनाथ खडसे यांच्या घरी जाण्यातच भाष्य केले होते. राऊत म्हणाले होते की एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही जातील. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले

देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर आहेत. आज नांदेडमध्ये बोलत असताना फडणवीस म्हणाले की, मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केलं आम्ही जाणं बंद केलं नाही. असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांना चांगलंच सुनावलं आहे. तसेच, राऊत यांच्या बद्दल कालचं बोललो. रोज काय काय बोलावं. ते एवढे महत्वाचे थोडीच आहेत, असा उपरोधिक टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असंही टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

News Desk

फडणवीसांनी नियुक्तीला विरोध केलेल्या राजकुमार ढाकणेंची हकालपट्टी

News Desk

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय नाविन्य निर्देशांक २०२१’ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर

Aprna