HW News Marathi
महाराष्ट्र

भास्कर जाधवांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया..!

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती आणि दरडी कोसळून दुर्घटना घडल्या त्या ठिकाणी पाहणी दौरा केला. तर चिपळूण मधल्या दौऱ्यात शिवसेनेचे भास्कर जाधव देखील उपस्थित होते. या दौऱ्यात असताना भास्कर जाधवांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि यानंतर शिवसेना आणि भास्कर जाधव टीकेचे धनी ठरले. मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता भास्कर जाधव यांच्या या कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जाधवांचं हे वर्तन अतिशय धक्कादायक असल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं

भास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावं. अशा संकटकाळात आपण जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा. जाधव यांचं हे वर्तन आपल्याला अजिबात योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी आज (26जुलै) माध्यमांशी बोलताना दिली. या वर्तनाची पक्षाने तसंच मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव यांच्यावर कारवाई होणार की नाही हा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..”

चिपळूणच्या पहाणी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान आणि गाऱ्हाणी ऐकत होते त्यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पहाणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले तेव्हा स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. “माझं घर गेलं… माझं दुकान गेलं… तुम्ही काहीतरी करा…”, असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. “तुम्ही काय पण करा… तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा… तुम्ही काय पण करा पण मदत करा..”. असं अगदी रडत रडत स्वाती यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..” असं म्हटलं.

आईला समजव… आईला समजव…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या भाषेत स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना सांगितलं. त्यावर फूल ना फुलाचा पकळी समजून आम्हाला मदत करा अशी मागणी स्वाती यांनी केली. मात्र भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. मात्र त्यानंतर मागे वळून पाहत, “बाकी काय?, तुमचा मुलगा कुठंय” असं भास्कर जाधव यांनी हातवारे करुन विचारलं. त्यानंतर स्वाती यांचा मुलगा दिसताच, “आईला समजव… आईला समजव… उद्या भेट” असं भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचं आमंत्रणही त्यांनी तावातावातच दिल्याचं पहायला मिळालं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२४ जानेवारीला होणारा राज्यव्यापी बंद शांततेत पार पाडणार

swarit

महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, बावनकुळेंचा गौप्यस्फोट!

News Desk

स्वच्छ स्थानकासह प्रवाशांना पुष्पगुच्छ देत भोकर आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

News Desk