HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आज (शनिवार, १६ एप्रिल) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते व हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईन. दरम्यान डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडा आणि महाराष्ट्रात काय चालले आहे ते बघा, राजू शेटींचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

‘‘त्या’ सूचने बदल, नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी’, विनायक राऊतांचा नितेश राणेंना सल्ला

News Desk

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna