HW News Marathi
महाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाच्या प्रभावी कामगिरीसाठी कायदा करणार असल्याची धनंजय मुंडेंची माहिती!

मुंबई। राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

पंचतारांकित अभ्यास केंद्र पुणे येथे उभारण्याचे विचाराधीन

सामाजिक न्याय विभाग व संविधान फाऊंडेशन यासह अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संघटना व पदाधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही प्रभावी माध्यम असून, यामार्फत यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचतारांकित अभ्यास केंद्र पुणे येथे उभारण्याचे विचाराधीन असून यासाठी जागा उपलब्धीनुसार आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा – अजित पवार

News Desk

महाराष्ट्र 2019 पर्यंत दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवरील वाढीव GST रद्द करावा; अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Aprna