HW News Marathi
महाराष्ट्र

“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” बहिण प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओनंतर धनंजय मुंडेंचा काळजीयुक्त संदेश!

बीड | मुंडे बहिण भावातील वाद हा सगळ्यांनाच माहित आहे. या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील अनेकवेळा पाहायला मिळाले आहेत. मात्र, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेलं नातं देखील काही प्रसंगी समोर येतं. काल (२४ एप्रिल) संध्याकाळी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रकृती ठिक नसल्याचे सांगत उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त करणारे एक ट्विट केले आहे.

“योग्य उपचार आणि काळजी घ्या” – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ ट्वीटमध्ये दिला आहे. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचं समजलं. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, असं धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

यावर प्रीतम मुंडे यांनीही ट्विट करत भावाच्या सदिच्छांना प्रतिसाद देत “धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

तर काल प्रीतम मुंडे यांनी एक ट्विट केले होते. “गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हे लक्षणं जाणवायला लागले. २१ तारखेला मी RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला करोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत आहे”, असं प्रीतम मुंडे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, रोहित पवारांनी दानवेंना सुनावले 

News Desk

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती

Aprna

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

News Desk