HW News Marathi
Covid-19

कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर धारावीने नाव नोंदवलं

मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या धारावी मॉडेलची दखल घेण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍ विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

धारावीमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२% वर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला.

जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेतलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देणारी आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा उद्रेक! पवारांच्या बारामतीत ७ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत ५,१२३ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

सोमय्या म्हणतात -“करुन दाखवलं”, पुढचा नंबर कुणाचा?

News Desk