HW News Marathi
महाराष्ट्र

शिस्तप्रिय तुकाराम मुंढेंना मिळाला मुख्यमंत्र्यांचा खंभीर पाठिंबा 

मुंबई | “तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मी शिस्तीच्या मागे उभं राहणार”, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची अनलॉक मुलाखत घेतली. यावेळी तुकाराम मुंढेंबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. काहीच दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही भूमिका मुंढेंविरोधी असलेली दिसली आहे.

“तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून तिथे शिस्त लागली आहे.शेवटी जनताही सगळं पाहत असलेच. तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत. हे विसरून चालणार नाही. एखादा अधिकारी नियमाचा कडक असेल आणि लोकांच्या हितासाठी त्याचा उपयोग करुन घेतला तर त्यात वाईट काय? काही नियम, काही कायदे कठोरपणाने अंमलात आणणे काहींना आवडत नसेल. मात्र, जर तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कठोरपणाने केली तर उलट त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सर्वांनी खंभीरपणे उभं राहायला हवे”, असे मुख्यमंत्री म्हणाले

आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्षामुळे नागपूरमध्ये प्रशासनविरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. “तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरु आहे. मुंढेंनी नितीन गडकरींना आव्हान दिले आहे. या सगळ्यात तुम्ही कोणासोबत आहेत. तुकाराम मुंढे कि लोकप्रतिनिधी ?”, असा प्रश्न असा विचारला असता शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढेंना आपला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘आरे’ मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती !

News Desk

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk