HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल !

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी राज्यातील वातावरण चिघळून निघाले होतं.या प्रकरणी API सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते.ATS आणि NIA कडून यासंदर्भातला तपास सुरू आहे.काल दिवसभर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॅंट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.

आता यानंतर भाजप आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हकालपट्टीची मागणी भाजपने केला आहे. दुसरीकडे सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

राम कदम यांनी ठाकरे सरकारवर प्रचंड टिका केली असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहेत. “अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी” असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच “अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनीत राणांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्वीट करत दिले उत्तर

Aprna

मनसेच्या नव्या झेंड्याला निवडणूक आयोगाची नोटीस

swarit

‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच आहे’, चित्रा वाघांचा राठोडांवर निशाणा

News Desk