HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्या मुलांची बरोबरी करू नको”,नारायण राणेंचा शिवसेनेवर पलटवार

कणकणवली | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर पलटवार केला आहे. यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाले. आता अग्रलेख वैगेरे येत आहेत. आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत हे पाहावं. संजय राऊत आम्हाला बोलण्यासाठी, माहिती काढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत असं नारायण राणे म्हणालेत. कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणेंनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती होत आहे. सामना आणि शिवसेनेची प्रतिमा लोकांमध्ये अजिबात चांगली नाही. समोरासमोर भेटलं की चांगलं बोलायचं आणि फोन आला की ये रे माझ्या मालका. माझ्या मुलांसोबत बरोबरी करु नका. दोघंही हुशार आणि शिकलेले आहेत, असा इशारा नारायण राणेंनी यावेळी दिला.

ही शिवसेना घडवण्यासाठी आमचाही हातभार

माझ्या मुलांची बरोबरी करू नको. मला माझ्या मुलांवर चांगले संस्कार आहेत. मला माझ्या प्रहार पेपर मधून कोण कुठे बसतात. कोणाचे काय केस हे सगळं उघड करणार, असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.अनिल परब राष्ट्रपती असल्यासारखे अटक करण्याचे आदेश देत होते. शिवसैनिक बोटावर मोजण्याइतके होते. नारायण राणे विरूद्ध बोललं की उत्तम पद मिळत उदाहरण येथील खासदार. ही शिवसेना घडवण्यासाठी आमचाही हातभार आहे, असं सांगायलाही नारायण राणे विसरले नाहीतमी दिल्लीत सेनेच्या खासदारांना सुद्धा निधी देणार होत आहे. सामना आणि शिवसेनेची प्रतिमा लोकांमध्ये अजिबात चांगली नाही. समोरासमोर भेटलं की चांगलं बोलायचं आणि फोन आला की ये रे माझ्या मालका. माझ्या मुलांसोबत बरोबरी करु नका. दोघंही हुशार आणि शिकलेले आहेत, असा इशारा नारायण राणेंनी यावेळी दिला.

मी दिल्लीत सेनेच्या खासदारांना सुद्धा निधी देणार

बाळासाहेबांना धोका होता. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं मातोश्री सोडायला. तेव्हा मला बाळासाहेबांनी मला आदेश दिले होते. नारायण तुझी टीम घेऊन ये. मी पूर्ण वेळ संरक्षण केलं. मी झोपलो सुद्धा नव्हतो, असं नारायण राणे म्हणालेत. मी दिल्लीत सेनेच्या खासदारांना सुद्धा निधी देणार. पण अट ठेवणार त्यांनी भाजपामध्ये यावं. माझ्या पाठीशी दिल्लीतील बडे नेते आहेत, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचं कोरोनामुळे निधन …

News Desk

उद्धवजी बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला – नारायण राणे

News Desk