HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी | उदयनराजें

सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. इतकेच नाही तर कराडला आलेल्या महापुरामुळे येथील पाटण कॉलनीतील झोपडपट्टी वासियांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाटण येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या येथील पूर परिस्थिती व पाटण कॉलनीतील पूरग्रस्त झोपडपट्टी वासियांचे नगरपालिकेच्या शाळा क्र. 3 मध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांची विचारपूस करण्यासाठी उदयनराजे यांनी त्यांची भेट घेतली .त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले आहे . तसेच तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण, महापालिकेचा मोठा निर्णय!

News Desk

AIMIM चे खासदार इम्तियाज जलील ताफ्यासह चांदिवलीच्या सभेसाठी मुंबईत दाखल

News Desk

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित!

News Desk