HW News Marathi
महाराष्ट्र

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान ‘राजगृह’वर काल (७ जुलै) संध्याकाळी झालेल्या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी करवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती संयुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल (७ जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या आणि घरातील कुंड्यांची नासधूस केली. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झाले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरात भीम आर्मीच्या मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी

swarit

‘सरकार दाऊदची गँग चालवताय का’? आशिष शेलारांचा सवाल

News Desk

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख तर आता निलेश लंके म्हणतात…..

News Desk