HW News Marathi
महाराष्ट्र

आता अशी करणार मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांची तपासणी 

नागपूर | देशात कोरोनाच्या रुपाने महारोगाने संपुर्ण देशाला घेरले आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याकारणाने कोणत्याही पद्धतीने एका माणसाचा स्पर्श हा दुसऱ्याला होणे जितके टाळता येईल ही बाब प्रत्येक जण काटेकोरपणे पाळत आहे. त्यामुळे ड्रिंक अॅन्ड ड्राईव्हच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. ब्रेथ अॅनलायझर वापरुन वाहन चालकाने मद्यपान केला आहे की नाही हे तपासायची पद्धत होती. मात्र आता कोरोनामुळे ही पद्धत बंद केल्याने दारु पिऊन गाडी चालवण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परंतु वाहन चालकांनो सावधान. जरी ब्रेथ अॅनलायझर वापरुन तपासणी केली नाही तरी तुमची सुटका होणार नाही. दारु पिऊन कुणी वाहनचालक धुमाकूळ घालत असेल किंवा पोलिसांना वाहनचालक दारु प्यायल्याची शंका आल्यास ते त्याला थेट वैद्यकीय तपासणीसाठी पाठवणार आहेत. पोलिसांना शंका आल्यास कारवाई केली जाणार असल्याने दारु पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

News Desk

‘१२ आमदारांच्या यादीवर तोंडावर मास्क ठेवलेलचं बरं, पण आमदारकी मिळाली तर आनंदच – मातोंडकर

News Desk

“अशोक चव्हाणांच्या घरापुढे 20 ऑगस्टला मूक मोर्चा”, संभाजी राजेंची राज्यव्यापी बैठकीत घोषणा!

News Desk