पुणे | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही माहिती ईडीने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीने काही महिन्यांपूर्वी चौकशीसाठी बोलावलं होतं.
अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. अविनशान भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल वेस्टिन- पुणे हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा याचा समावेश आहे.
ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.
— ED (@dir_ed) June 21, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.