HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीकडून राज ठाकरेंवर होणार कारवाई ?

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) लवकरच राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या आठवड्यात राज ठाकरे यांना हा समन्स बजावण्यात येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, कोहिनूर मिल ३ खरेदी प्रकरणी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून ही कारवाई करण्यात येणार आहे.

खरंतर राज ठाकरे यांनी नुकतीच बुधवारी (१ ऑगस्ट) ईव्हीएमविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. त्याचप्रमाणे, मनसे येत्या ९ ऑगस्टला ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी सध्या घेतलेल्या ईव्हीएमविरोधी आक्रमक भूमिकेमुळे भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांच्यावर या कारवाईच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची मोठी चर्चा सध्या रंगत आहे.

ईडी आणि एसएफआयओकडून कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अँड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि ८६० कोटींच्या गुंतवणुकीचा तपास सुरु आहे. ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकाऱ्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून आता ईडीकडून राज ठाकरे यांना समन्स बजावला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच !

News Desk

नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडीला अपघात!

News Desk

राज्यात 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233  रुग्ण कोरोनामुक्त!

Ruchita Chowdhary