HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा

मुंबई | राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालल्याचं पाहायला मिळत आहे. घोटाळे असो किंवा भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरून राजकीय नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे नेहमीच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आता शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. अशातच आज पुन्हा एकदा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत देखील उपस्थित होते. या पत्रकार परषदेत संजय राऊतांनी ईडी व किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी थेट ईडीलाच आव्हान देत पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. आमच्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. हे पुरावे घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात जाऊ. पण तेव्हा ईडीचं कार्यालय बंद झालेलं असेल, असं राऊत म्हणलेत. तर दुसरीकडे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भ्रष्टाचारावरूनही सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

“रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं”


दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी भाजपवरही टीका केली आहे. भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांना खंडणीखोर बनवलं आहे. ती त्यांची साधनं झाली आहेत. पण आम्ही ते उघड केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. कुणाला अंगावर यायचं असेल तर या. आम्ही तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. तसेच “कितीही धमक्या द्या, तरी रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं”, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॅाकडाऊनसंबंधी आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला !

News Desk

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ‘निर्लज्ज’ असा शब्द उच्चारला!

News Desk

‘पुर्वी राजा विरोधात चोर, दरोडेखोर एकत्र यायचे याचा अर्थ राजा चांगले काम करतो’, कपिल पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल!

News Desk