HW News Marathi
देश / विदेश

अन् खडसे फडणवीसांना म्हणाले, “आता जेवल्याशिवाय जाऊ नका…”

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विशेष नाराजी राहिलेली आहे. वेळोवेळी खडसे यांनी ती नाराजी जाहीरपणे कडक शब्दांत बोलूनही दाखवली आहे. दरम्यान, टोकाची टीका आरोप करणाऱ्या खडसे यांनी मात्र फडणवीस घरी आल्यावर तितक्याच आपुलकीने त्यांचे आदरातिथ्यही केले आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या अनुपस्थितीत निवासस्थानी आलेल्या देवेंद्र फडणवीसांना फोनवरून ” आता जेवल्याशिवाय जाऊ नका” अशी साद घातली . मात्र, फडणवीसांनी “आता नाही, पुढच्या वेळी नक्की जेऊ..” असे नम्रपणे सांगत खडसेंना प्रतिसादही दिला.

देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (१ जून) चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. जामनेरहून ते थेट मुक्ताईनगरला गेले. यावेळी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर फडणवीस एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले होते. यावेळी फडणवीसांसोबत गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे हे देखील होते. याच दरम्यान, एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. परंतु, खडसे आणि फडणवीस यांच्यात फोनवर बोलणे झाले.

फोनवरून आपुलकीने आदरातिथ्य

देवेंद्र फडणवीस जेव्हा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत होते तेव्हा एकनाथ खडसे मुंबईत होते. त्यामुळे खडसे यांची फडणवीसांशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. परंतु, रक्षा खडसे यांनी फडणवीस स्वागत आणि आदरातिथ्य केले. त्याचसोबत चहापान सुरु असताना भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फोन करून खडसे व फडणवीसांमध्ये संभाषण घडवून आणल्याची माहीती मिळते.

खडसे फोनवरून फडणवीसांना म्हणाले की, “मी इकडे मुंबईत आहे. पण आपण आमच्या घरी आलात आपले स्वागत आहे. मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका.” खडसेंच्या या विनंतीला नम्रपणे उत्तर देत फडणवीस म्हणाले की, “आपल्या भागात आलो आहे. परंतु, जेवणाचे नियोजन अन्य ठिकाणी आधीच झालेले आहे. पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की भोजन करेल..”, असे फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

पंतप्रधान-राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय विषयांवर झाली चर्चा

News Desk

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk