HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आज हजर राहणार

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज (१५ जानेवारी) ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ११ वाजता ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं होतं. पण कोरोनाच्या कारणामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्याने आज एकनाथ खडसे ईडी चौकशी करता हजर राहणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. खडसे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. एकनाथ खडसे मुंबईत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यात भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ३० डिसेंबर २०२०ला खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने क्वॉरंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वॉरंटाईन काळ संपल्यावर खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना २०१६ मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk

‘अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश’ -धनंजय मुंडे

News Desk

चक्क मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल!

News Desk