HW News Marathi
देश / विदेश

अखेर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित ! खुद्द जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

जयंत पाटील यावेळी म्हणाले कि, “आपण भाजपचा राजीनामा दिला असल्याचे एकनाथ खडसेंनी आज मला सांगितले. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसेंनी साडे तीन दशके भाजपमध्ये नेतृत्त्व केले आहे. भाजपची खऱ्या अर्थाने वाढ करणाऱ्या खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंना कोणते पद देण्यात येईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, खडसे राष्ट्रवादीत येत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”

एकनाथ खडसेंच्या संपर्कात बरेच आमदार आहे. त्याचप्रमाणे, खडसेंसोबत बऱ्याच जणांना येण्याची इच्छा आहे. त्यामुळे तशी इच्छा असणारे देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असे स्पष्ट संकेतही यावेळी जयंत पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, गेल्या कित्येक महिन्यांपासून खडसेंच्या पक्षांतराच्या अनेकदा चर्चा झाल्या. वारंवार पक्षाच्या मनधरणीमुळे खडसेंनी अधिकृतरीत्या कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता अखेर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याने भाजपला जबरदस्त मोठा फटका बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३५ अ’ आणि ‘कलम ३७०’

News Desk

भारत- चीनमध्ये युद्धाची शक्यता नाहीच!

News Desk

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण सोहळा

News Desk