HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंनी फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं, भाजपची खडसें विरोधात आक्रमक भूमिका!

मुंबई | सतत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढं काम केलं तेवढं कोणीही केलं नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरेकरांच्या या टीकेनंतर भाजप आता खडसेंविरुद्ध आक्रमक होणार असे संकेत मिळत आहेत.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे फडणवीसांबद्दल?

“भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितलं. “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे किती तरी नेते होते. त्यांच्यासोबत आजपर्यंत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही,” असंही ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२४ नंतर जे घडेल ना…! – राऊतांचा भाजपला मोठा इशारा

Aprna

शहिदांच्या कुटूंबाचा असाही होणार सन्मान

News Desk

“एका महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का?”, जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना सवाल 

swarit