HW News Marathi
महाराष्ट्र

गैरव्यवहार असल्यास, कोणी दोषी असल्यास तथ्य बाहेर येईलच, जलयुक्त शिवारावर खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव | फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या निर्णयावरच भाजपा नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

जलयुक्त शिवारबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांनी सांगितलं होतं. देवेंद्रजींनीच सांगितलं होतं की, त्यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार असेल, तर चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून सरकारला आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं या ठिकाणी चौकशी करायचं ठरवलेलं आहे, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत. त्यात गैरव्यवहार असल्यास, कोणी दोषी असल्यास तथ्य बाहेर येईलच, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘४५ हजार कृषी विद्यार्थ्यांना दिलासा,’ दादा भुसेंची महत्वाची माहिती!

News Desk

भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर!

News Desk

“देशमुखांना जेलमध्ये टाकलंत, आज ना उद्या किंमत मोजावीच लागेल!”- शरद पवार

News Desk