HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक

नवी दिल्ली | महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंतिम ९  जून आहे. महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून ६ जुलै ते २१ जुलै रोजी या कालावधी दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून काल (२५ मे) रात्री जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे १० सदस्य तसेच उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण २० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या‍ १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या ७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ २  जानेवारी २०२२ रोजी संपूष्टात आलेला आहे. सदरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना २ जून रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख ९ जून रोजी आहे. अर्जांची छाननी १० जून रोजी होणार असून, १३ जून रोजी अर्ज मागे घेता येतील. मतदान २० जून रोजी सकाळी ९ वाजतापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाकडून दिले गेलेले आहेत. निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे़ याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आयोगाने कोविड १९ बाबत जाहीर केलेल्या विस्तृत मार्गदर्शक सूचना पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.

https://eci.gov.in/files/file/14151-schedule-for-bye-election-in-3-assembly-constituencies-of-odisha-kerala-and-uttarakhand%E2%80%93-reg/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला?’

News Desk

राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मागितला पाहिजे, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा  

News Desk

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान!

News Desk