ठाणे | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज (२४ नोव्हेंबर) ईडीने छापा टाकला आहे. छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच, महत्वाची कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत. जवळपास ४ तास चौकशी केल्यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेतले आहे. तर, ईडीने दुसरे पथक पुर्वेश सरनाईक यांच्या घरी दाखल झाले आहे.
Maharashtra: Enforcement Directorate officials detain Shiv Sena MLA Pratap Sarnaik's son Vihang Sarnaik (in blue shirt) from their residence in Thane. https://t.co/Wd3RqIPi68 pic.twitter.com/YQQE2sRPDu
— ANI (@ANI) November 24, 2020
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.