HW News Marathi
महाराष्ट्र

घरोघरी राष्ट्रवादीची घडी!, परळी शहारत प्रत्येक रविवारी धनंजय मुंडे मतदात्यांच्या दारी

बीड | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघात ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. मतदारसंघात पक्षाची ताकद अधिक वाढवणे, सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवणे आणि राष्ट्रवादी सदस्य नोंदणी असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. परळी शहरातून प्रत्येक रविवारी एक वॉर्ड असा या उपक्रमाचे स्वरूप असून या कार्यक्रमास परळी येथील मिलिंद नगर या प्रभागातून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकाला भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून देण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे यांचा फोटो असलेले हे घड्याळ आता परळीतील प्रत्येक घरात दिसणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीचा पराभव करत विजय मिळवला होता. परळीकरांनी २० हजारांच्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले होते. याबद्दल मतदारांचे आभार देखील मुंडे यांनी या निमित्ताने मानले.

परळी शहरातून सुरु झालेल्या राष्ट्रवादी आपल्या दारी या मोहिमे दरम्यान, अनेकांना सदस्यत्वाचे अर्ज देखील देण्यात आले. परळीकरांनी मला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवले, मी कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. येत्या तीन-चार महिन्यात महापालिका, जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत.

या निमित्ताने धनंजय मुंडेकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रवादी आपल्या दारी या मोहिमेची चांगलीच चर्चा होतांना दिसते आहे. या मोहिमे अंतर्गत परळी शहरातील घराघरात जाऊन धनंजय मुंडे नागरिकांच्या भेटी घेत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत केले जात आहे. मुंडे या स्वागताचा स्वीकार करतांना प्रत्येक घरात घड्याळ भेट देत आहेत. शरद पवार आणि स्वःताचा फोटो असलेल्या या घड्याळींचे वाटप सुरू असल्याने या मोहिमेची चांगलीच चर्चा मतदारसंघात रंगतांना दिसून येत आहे.

मात्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचाही हा मतदार संघ असून त्या मागच्या टर्म च्या पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील काम पाहिले होते तसेच त्यांनी 3 विभाचे मंत्री म्हणून देखिल काम पाहिले होते, सध्या स्थितीला पहायचे झाले तर भाजपा च्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र काम हे संत गतीने सुरू असल्याचे स्थानकातून बोलले जात आहे.

मागच्या 2 टर्म पासून धनंजय मुंडे यांच्या ताब्यात परळी नगर पालिका असून ही पालिका जर भाजपच्या ताब्यात मिळवायची असेल तर पंकजा मुंडे यांना तारेवरची कसरत करावी लागणार हे ही तितकेच खरे आहे. आता आगामी निवडणुकाच ठरवतील की बाजी कोण मारणार धनंजय भाऊ की पंकजा ताई?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर रद्द

News Desk

शरद पवारांच्या कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नाना पटोलेंचं पवारांकडे बोट?

News Desk

ममता बॅनर्जींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची निवासस्थानी घेतली भेट…!

News Desk