HW News Marathi
महाराष्ट्र

Jay Ajit Pawar Exclusive : युवकांच्या मदतीसाठी राजकारणात येईन !

पुणे | राजकारणात येण्याची मनापासून इच्छा नाही, पण युवकांच्या मदतीसाठी मी राजकारणात नक्की येईन, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी राजकारणात येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. जय पवार एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना असे म्हणाले की, “राजकारणात येण्याचे माझे मन नाही, पण मी पक्षाचे कोणते तरी पद घेऊन, मी पुढे युवकांसाठी काही करायचे वाटले तर युवकांच्या मदतीसाठी मी राजकारणात नक्की येईन, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

या निवडणुकीत बेरोजगारी हा महत्त्तवाचा मुद्दा आहे. युवकांशी संवाद साधतना लक्षात आले की, शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, यासाठी दादा (पार्थ पवार) यांनी सुशिक्षितांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत अजित दादांची लिड होती. आता सुद्धा बारामतीकरांचे पवार कुटुंबियांवरील प्रेम पाहता पुन्हा एकदा जास्ती जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास जय पवार यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे.

या वर्षी जसा पाऊस झाला मला वाटेत नाही की, यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, असे देखील जय पवार म्हणाले. जय पवार त्यांचे वडिल अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बारामतीतून निवडणुकीचे रिंगणात उतरणार आहे. जय पवार यांनी वडिलांच्या प्रचारांची धुरा सहभागी झाले आहे. जय पवार यांनी वडिलांच्या प्रचारासाठी पदयात्रा, घरोघरी आणि युवकांशी संवाद साधत प्रचार करत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकार्‍यांनी कुणाची कठपुतळी होऊ नये, रश्मी शुक्ला प्रकरणावर कॉंग्रेसची प्रतिक्रिया  

News Desk

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ!

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, २ जणांचा मृत्यू

News Desk