HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणावर धर्मगुरुंच्या साक्षीने अखेर संजय राठोड बोलणार ?

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पेटले आहे. या संपूर्ण प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे येत असल्याने विरोधी पक्षही आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (१५ फेब्रुवारी) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर, आता एक मोठी बातमी येत आहे. या संपूर्ण प्रकरणी अखेर संजय राठोड गुरुवारी म्हणजेच १८ फेब्रुवारीला स्वतः बोलणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच आता संजय राठोड यांच्या चौकशीबाबत विधान केल्याने राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान,पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड हे अचानक नॉट रीचेबल झाले आहेत. ते त्यांच्या मुंबई आणि यवतमाळमधील निवासस्थानी देखील नसल्याने संशय आणखी बळावला आहे. त्यातच राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपही याप्रकरणी आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिममधील पोहरा देवी येथे येऊन संजय राठोड आपली बाजू मांडतील.

वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी गावात बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. या मंदिरात बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत असतात. त्यामुळे, संजय राठोड हे गुरुवारी याच मंदिरात येऊन धर्मगुरूंच्या साक्षीने आपली बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, संजय राठोड यावेळी नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मिडियावरही बाप्पा मोरया!

News Desk

सीताराम कुंटे यांची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

News Desk

“‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं”, रोहित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

News Desk