HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर गडावरून सुखरुप सुटका

मुंबई | हरिश्चंद्रगड येथील कोकणकड्याच्या पायथ्याला अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या मदतीने या ट्रेकर्संना वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. असे असले तरी ट्रेकर्संना बेस कॅम्पपर्यंत पोहचण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागणार आहे. सूर्योदय झाल्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत ‘न्याहारी’चे खाद्यपदार्थ, पाणी, ग्लुकोज, चहा, बिस्किटे पोहोचविली. त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षित ट्रेकर्स च्या मदतीने गड उतरण्यास सुरुवात केली आहे.

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिशचंद्रगड येथे ट्रेकिंसाठी गेले होते. यामध्ये ५ महिला आणि त्या ठिकाणाहून दिड किलोमीटर पुढे १०० फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते. ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची यासाठी मदत घेतली जात आहे. या ट्रेकर्संना काळोख्या गडावर रात्र काढावी लागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीत महाविकासआघाडीच्या सतीश चव्हाण यांची आघाडी

News Desk

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

News Desk

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे! – नितीन गडकरी

News Desk
देश / विदेश

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

सुकमा | छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम या जंगल परिसरात आज (२६ नोव्हेंबर) सकाळी सुरक्षा रक्षकांनी आठ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला आहे.

सुकमा येथील पोलीस अधिकारी अभिषेक मीणा यांनी सांगितले की, आठ नक्षलवाद्यांचा ठार केले, परंतु यावेळी झालेल्या चकमकीत डीआरजीचे दोन जवान शहीद झाले आहेत. एसटीएफ आणि डीआरजी यांनी संयुक्तरित्या नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई केली. सुकमा जिल्ह्यातील सकलार गावात नक्षली लपून बसले होते. तसेच, त्याठिकाणी अद्यापही गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर नक्षलवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर एसटीएफ आणि डीआरजी यांनी संयुक्त पथक घटनास्थळी पोहचले. संयुक्त पथकाने या मोहिमेला ‘प्रहर चार’ असे नाव देण्यात आले होते. पोलिसांचे हे पथक किस्टाराम हद्दीत पोहचल्यानंतर नक्षलवाद्यांनी अंधाधुद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर देत ८ नक्षलवादी मारले गेले, तर दोन जवान शहीत झाले, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली आहे.

 

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्यावर सोपवली

swarit

शिवसेना-राष्ट्रवादी शेतकरी विधेयकावरून राज्यसभेत भाजपची कोंडी करणार ?

News Desk

मीरा कुमार यांना काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी

News Desk