HW News Marathi
महाराष्ट्र

कलावंतांच्या मदतीसाठी सरसावला एक कलावंत

पुणे | कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे, व्यापार, मालिका, सिनेमांचे शुटींग सगळे काही ठप्प झाले आहे. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची कला ती म्हणजे लोककला आणि लोककलावंत यांनाही याचा फटका हा जोरदार बसला आहे. महाराष्ट्रात डिसेंबर ते एप्रिल हा काळ जत्रेचा असतो. गावागावांत अनेक उत्स्व, जत्रा या भरवल्या जातात. त्यावरच लोक कलावंत आपला उदरनिर्वाह करत असतात.पण कोरोनामूळे सर्व यात्रा, जत्रा रद्द केल्याने या कलावंताना कसं यातुन बाहेर पडायचं हा मोठा प्रश्न पडला आहे.

याच कलावंतांच्या मदतीसाठी एक कलावंत पुढे आला आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि युवा उद्योजक पुनित बालन यांनी या तमाशा कलावंतांना आर्थिक मदत केली आहे. किमान या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे घर चालावे इतपत त्यांनी मदत केली आहे. कलेची जाण आणि त्याचा आदर आपणही कायम करायला हवा. कारण आपल्या आयुष्यात मनोरंजनाचे काम हेच कलावंत दिवस रात्र करत असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात तर काहींचा तोल जातो, त्यामुळे…

News Desk

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

News Desk

शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहीम!, निलेश राणेंचा महाविकास आघाडीवर घणाघात!

News Desk