HW News Marathi
महाराष्ट्र

आधी लाचखोर नवऱ्याची बायको,नंतर मांजरीची उपमा, महेबूब शेख यांचा चित्रा वाघांवर पुन्हा पलटवार !

औरंगाबाद। राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय.चित्रा वाघ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. मेहबूब शेख पारनेर दौऱ्यावर असताना त्यांनी चित्रा वाघ यांना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ म्हणत ‘आधी नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, मग आम्हाला शिकवा’, असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला होता. त्यानंतर चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात जोरदार आरोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या.

लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर वाघ होत नाही

“तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायको हीच आहे. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर वाघ होत नाही. आपल्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे तुम्ही बोला”, असं मेहबूब शेख चित्रा वाघ यांना उद्देशून म्हणाले. “मेलेल्या माणसाच्या वारसांना नोकरी आणि मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगा”, असंही महेबूब शेख म्हणाले.“त्या स्वत:ला वाघ म्हणवतात. पण मांजर वाघ होत नसते. असल्या खोटारड्या वाघासोबत माझा मुलगा रोज खेळत असतो. चित्रा वाघ काय आहेत हे मला नीट माहिती आहे. त्यांची बरीच प्रकरणं मी बाहेर काढणार आहे”, असा इशाराही महेबूब शेख यांनी दिला.

चित्रा वाघ महेबूब शेख प्रकरण नेमकं काय?

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं.

वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.कालपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार सामना रंगलाय. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही वार-प्रतिवार करतायत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

Aprna

‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, अन्यथा परिणाम गंभीर होतील’

News Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk