HW News Marathi
महाराष्ट्र

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सांगितला आर्थर रोड कारागृहाचा अनुभव

नाशिक। आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झालीय.आणि आज कारागृहातून बाहेर आला. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जेलवारीची विदारक परिस्थिती सांगितली आहे. माझा देखील आर्थर रोड कारागृहाचा दोन-अडीच वर्षांचा अनुभव होता. कारागृहात सिनेमाचे कलाकार असतात तसे इतरही कलाकार असतात. संजय दत्त यांनीही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं. कैदी कसे जनावरांसारखे राहतात हे मी पाहिलं आहे. प्रचंड गर्दी असते. पण तरी देखील कोरोना आत घुसला नाही हे महत्वाचं आहे. अनेक लोक 15 हजारांचा जामीन भरू शकत नाहीत म्हणून वर्षानुवर्षे आत आहेत.

एक दिवस त्याच जेलमध्ये मला जावं लागलं

नाशिकच्या कारागृहात अनेक स्वातंत्र्य योद्धे राहिले आहेत. साने गुरुजीही याठिकाणी होते. कारागृहात येणारे कैद्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही समाजाला नकोसे असतात. तर काही लोकांना जामीन झाला तरी ते परत आत येतात. आतमध्ये सगळ्या सोयी असल्यानं काहीचं आत येणं जाणं सुरु असतं, असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. त्याचबरोबर माझाही आर्थर रोड कारागृहाचा दोन अडीच वर्षाचा अनुभव आहे. गृहमंत्री असताना कारागृहातील पोलिसांचा पगार मी वाढवला. एक दिवस त्याच जेलमध्ये मला जावं लागलं. जे माझ्या स्वागतासाठी होते, नंतर तेच माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते, अशी खंत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. आता दिवस परत बदलले आहेत. काही खऱ्या आरोपाखाली जेलमध्ये असतात तर काही खोट्या आरोपांखाली असतात, असंही ते म्हणाले.

तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान आर्थर रोड जेलमधून आज बाहेर

बॉलिवुड किंग खानच्या मुलाला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गुरूवारी जामीन मिळाला. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात सविस्तर अटी शर्थीसह जामीनाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केला. पण जामीनासाठीची औपचारिकता शुक्रवारी पुर्ण न झाल्याने आर्यनला शुक्रवारची रात्र आर्थर रोड कारागृहातच काढावी लागली. जामीनाची पेटी सकाळी ५.३० वाजता उघडल्यानंतर अखेर आर्यन खानचा जामीन अर्ज तुरूंग अधिक्षकांकडे पोहचला. जामीन अर्जावरील संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानेच सकाळी ११ वाजताच्या सुमारास आर्यनला आर्थर रोडमधून सोडण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसारच शाहरूख खानचा बॉडीगार्ड सकाळी १०.२७ वाजता आर्यन खानच्या जामीनानंतरच्या पुढच्या प्रक्रियेसाठी हजर झाला. याठिकाणी शाहरूख खान स्वतः हजर न राहता त्याचा अंगरक्षकच आर्यनला घेण्यासाठी याठिकाणी आला. शाहरूख खान मात्र वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती काही टेलिव्हिजन चॅनेल्सने दिली होती. सकाळपासूनच शाहरूख खान आपल्या कायदेशीर टीमसोबत याठिकाणी हजर असल्याचे वृत्त काही चॅनेल्सने दाखवले होते. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान आर्थर रोड जेलमधून आज बाहेर पडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’, संजय राठोड यांची सगळ्यांना हात जोडून विनंती

News Desk

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

News Desk

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

News Desk