HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवभोजना’साठी आधारकार्ड सक्ती नाही, छगन भुजबळांनी दिली माहिती

मुंबई | विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी अवघ्या १० रुपयांत शिवभोजन योजनेचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर येत्या शुक्रवारी (२६ जानेवारी) सुरू होणार आहे. या शिवभोजन आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. तर शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

शिवभोजनासाठी आधार कार्ड दाखवावे लागणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत. यात दरम्यान, ’10 रुपयात जेवणाची थाली … असे समजते की तेथेही खुप अट्टी शर्थी आहेत . आहो गरीबाला जेवू घालताय .. का त्याची थट्टा करताय . आमची मागणी आहे बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे,’ असा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि माजी आमदार राम कदम यांनी केला आहे.

मुंबईत केईएम, नायर आणि कूपर हॉस्पिटलसह १५ ठिकाणी शिवभोजन थाळीची केंद्र सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर येथे चेहरा ओळख करणारे सॉफ्टवेअर अंमलात आणणार आहे. जेणेकरुन शिवभोजन थाळी योजना लागू असणाऱ्यांचा चेहरा ओळखण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांत दहा रुपयांत शिवभोजन थाळीची योजना सुरु आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुजय विखेंनी रेमडेसिवीरचा साठा थेट दिल्लीतून आणला,राज्य सरकार काय करणार ?

News Desk

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

News Desk

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

News Desk