HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला

मुंबई | ‘मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच,’ असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात वाद पेटून उटला होता. यानंतर भाजपचे लेखक आणि आमदार जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक मागे घेतले असून शर्वांची क्षमा मागितल्याची माहिती कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करत दिली होती. यानंतर हा वाद संपल्याचे सर्वांना वाटले होते.

दरम्यान, “‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. मोदींच शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात काही गैर नाही”, असे सुरेश हाळवणकर यांनी म्हटले. ते मंगळवारी (१५ जानेवारी) कोल्हापुरात एका कार्यक्रमात बोलत होते.

इतकेच नव्हे तर या कार्यक्रमाला खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. हळवणकरांच्या व्यक्त्यव्यांमुळे पुन्हा नवीन वाद उफळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

News Desk

महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर

swarit