HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पोलिसांना वारंवार गुंगारा देत होते. आणि आता त्याच परमबीरसिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं आहे. त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे.राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयानं फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंग यांच्याबरोबरच रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे.

आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

न्यायालयानं या तिन्ही आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते बजावण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे आढळले नाहीत. परमबीर यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतीश बुरुटे व खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर व त्यांचे कुटुंब मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळे हे तिघेही फरार झाल्याचं निष्पन्न होत असल्यानं त्यांना आता फरार घोषित करण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम 82 व 83 अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी असंही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आपल्या अर्जात म्हटलेलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive Tatya Lahane | कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बाबी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घ्या…

swarit

३०० कोटींचा मालक ५-६ कोटींसाठी आत्महत्या करतो? हे पटण्यासारंखं नाही – निलेश राणे

News Desk

शरद पवारांनंतर जयंत पाटलांनी घेतली पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट !

News Desk