HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनंतर जयंत पाटलांनी घेतली पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट !

मुंबई | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली व मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.

दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्याप्रमाणावर होवू पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शरद पवारांनीही घेतली भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि आता ते कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. बोम्मई यांनी स्वतः फोन करून पवारांना भेटण्याची व्यक्त केली अशी माहित शरद पवरांनी दिली आहे. एकीकडे जिथे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि बोम्माईंची भेट झाली आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.बोंमाईंशी भेट झाल्याचं शरद पवारांनी त्यांच्या ट्विट मधून कळवलं आहे. ते म्हणाले,” माझ्या बंगलोर दौऱ्यावर मला कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बोम्मई यांचा फोन आला ज्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या पदाचा आदर मनात ठेवून, मी जाऊन त्याच्याशी सौजन्याने भेट घेण्याचा निर्णय घेतला.” या वाढत्या भेटीगाठींमुळे नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळणार का अश्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रिया दत्त काँग्रेसच्या सचिव पदावरून पाय उतार

swarit

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

News Desk

“फसवणूकीने तुम्ही सत्तेवर आलात, आलाच आहात तर स्वकर्तृत्वही दाखवा”, भाजपने मुख्यमंत्र्यांना सुनावले

News Desk