HW News Marathi
देश / विदेश

मराठमोळे मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

नवी दिल्ली | मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहेत. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज (३१ डिसेंबर) सेवानिवृत्त झाले आहेत. रावत यांच्या जागी मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. नरवणे यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये मनोज नरवणेंकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

नरवणे मूळचे पुण्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी असून त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनडीए मधून लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील. नरवणे यांच्या निवडीसह आता हवाईदल, नौदल आणि भूदल अशा तिन्ही दलाच्या प्रमुखपदी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या ५६ व्या बॅचचे अधिकारी विराजमान होतील.

नरवणे हे जून १९८० मध्ये ते ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

Gauri Tilekar

रामनाथ कोविंद येत्या २३ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार ?

News Desk

सांगलीची सीमा बंद ! बाहेरच्यांना नो एंट्री !

Arati More