HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग – गिरीश महाजन

जळगाव | भाजप नेते गिरीश महाजान यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात पुण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग असून त्याचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे. गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाजन यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असं महाजन म्हणाले आहेत.

या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत: उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेल, असं ते म्हणाले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ ही मराठा समाजाची संस्था आहे. ती केवळ मराठा समाजापूरतीच मर्यादित आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीवर इतर समाजाचे लोक येऊ शकत नाहीत, असं त्यांच्या बायलॉजमध्येच नमूद करण्यात आलेलं आहे. मी ओबीसी असून माझे इतर सहकारी वेगवेगळ्या समाजातील आहेत. मग ते या संस्थेचे सदस्य कसे होतील? आम्ही ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न केला असं कसं म्हणता येईल? असे सवाल करतानाच या मागे बोलवता धनी कोण आहे, हे सर्वांनाच माहीत असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बैलगाडी नदीत पडून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”, संदीप देशपांडेंचा टोला

News Desk

‘संभाजी राजेंसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळात कोणकोणते नेते?’

News Desk